कृष्णाने द्वारकाMVI_3706व गमनासाठी पांडवांना विनंती केली

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

व्यक्ती परिचय

व्यक्ती परिचय


गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळात मंगला ओक रामायण, श्रीमद भागवत, गीता, गुरूचरित्र, आदि महान ग्रंथांच्या, महानायकांच्या भारतीय संत चरित्रांच्या अभ्यासक आहेत. अध्यात्मशास्त्राचा गाभा -  भक्ती मार्ग सामान्य जनांना आपल्या गोड आवाजात, सुंदर चालीत, ओघवत्या भावपूर्ण रसाळ वाणीने,  सोप्या-साध्या भाषेतून कथन करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. यामुळे  त्यांच्या कीर्तनाचे प्रवचनांचे कार्यक्रम अत्यंत रंगतात. 'कीर्तनभूषण' या पदवीने त्यांना पुर्वी सन्मानित केले गेले आहे. वयमानप्ररत्वे त्या बसून कार्यक्रम करतात.
स्व. पती जनार्दन ओक यांच्या प्रोत्साहनामुळे एक हौशी स्त्री कीर्तनकार म्हणून त्यांनी सुरवात केली. अनेक ज्ञानीजनांच्या विशेषतः कै. कमाताई वैद्यांच्या मार्गदर्शनातून अनेक श्रोत्यांना आपापल्या जीवनात अध्यात्मिक आनंद मिळवायची प्रेरणा त्यांच्या प्रवचन-कीर्तनातून मिळाली.
मराठवाड्यातील परांडा, शा अगदी खेड्यातील मंदिरांपासून ते माधवनगर, सांगली, मिरज, इचलकरंजी, पुणे-मुंबई आदी अनेक शहरातील मोठ्या सभास्थानी त्यांनी आपले कला गुण दाखवून चाहत्यांची मने शांत केली आहेत. मुख्यतः त्याचा स्त्री श्रोता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रात व गोव्यात आहे. अनेक विद्वानांनी त्यांच्या कथा-कीर्तनाची प्रशंसा केली आहे. चिन्मय मिशनच्या पुज्य तेजोमयानंदांनी व सुप्रसिद्ध संतवाङ्मय अभ्यासक पुज्य कै. कमाताई वैद्य आदींच्या कृपाशीर्वादाने त्या पुनीत झाल्या आहेत. 
महाभारतातील युद्धानंतरच्या शांततेच्या काळातील महाभारतातील पर्वातील  कथानक हाताळताना भीष्म - धर्मराज याच्यातील चर्चेतून व्यक्तिचे, जनसमुहाचे, समाजाचे, राष्ट्राचे, तसेच सत्ताधाऱ्यांचे, गुरूजनांचे, राजाचे व समाजपुरुषाचे कर्तव्य कर्म काय याची ओळख विविध गोष्टींच्या मधून व परस्पर चर्चेतून केलेली आहे. हा कथा भाग ऐकणाऱ्यांना विशेष आनंद देऊन जाईल यात संशय नाही.
आधी इस्लामपुर, नंतर माधवनगर, जयसिंगपुर, सांगली व सध्या पुण्याच्या पुर्वभागातील खराडी येथील पद्मश्री बेहेरे वृद्धनिवासात राहून त्या आपल्या अध्यात्मिक साधनेतून आत्मिक आनंद अनुभवत आल्या आहेत.
दि. 22 ऑगस्ट 2014 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे देहावसान झाले.
संपर्क पत्ता - मंगला ओक
c/o शशिकांत ओक.
ए - 4  /404 गंगा हॅमलेट हौ. सो. विमान नगर, पुणे. 411014.
मो. क्रमांक - 95525 60530.(मं),  9881901049(श),

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 1


मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचनमाला पुष्प 1


कथन पुष्प 1 (प्रथम दिवस भाग 1 )
मंगला ओक

या महाभारत कथनाची पार्श्वभूमी व त्यातून अपेक्षित लाभ... सांगतायत मंगला ओक.
... 2013 फेब्रुवारीच्या 13 तारखेपासून पुढील 15 - 20 दिवसात खराडी येथील वृद्धनिवास व सुनीता उर्फ नंदा करमरकर यांच्या पौडरस्त्यावरील घरी केले गेलेले हे कथन अगदी प्राथमिक साधनांनी केले गेलेले आहे, म्हणून अपेक्षित तांत्रिक दर्जा नसला तरी कथानकातील गोडी व विषयवस्तूच्या प्रचंड आवाक्यामुळे काही त्रुटी श्रोते मान्य करून घेतील अशी आशा करतो.  - शशिकांत ओक...




सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2

मंगला ओकांची महाभारतावरील प्रवचन माला पुष्प 2
 (इथे खालील लिंकवर क्लिक करून ऑडिओ डाऊनलोड करून ऐकता येईल) 
कथन पुष्प 2 - प्रथम दिवस भाग 2 

दिवस 1 भाग 2
ध़ृतराष्ट्रास महाुद्धाच्याहानीने आलेली विवशतेवर संजयनी, विदुरांनी, व्यासांनी समजूत घालून त्याचा विषाद कमी करायचे प्रयत्न केले. कौरव आणि पांडव हस्तिनापूर सोडून गंगेच्या किनाऱ्ऱ्यावर पोहोचले.
कर्ण जन्मरहस्य पांडवांना कुंतीने सांगितले. मी एक महिन्याकरिता गंगे किनारी घालवू इच्छितो. नारदांना विनंती करून बोलावले गेले. युधिष्ठिराचा प्रज्ञावादाला. अर्जून, भीम, नकूल, द्रौपदी यांनी सद्य स्थितीत धर्माच्या विषादाची निंदा करून उपदेश केला.  

मंगला ओकांच्या प्रवचनातील कथा भाग कुठे व कसा उपलब्ध होतो ?


मंगला ओकांच्या प्रवचनातील कथाभाग प्रत्यक्ष महाभारत ग्रंथात कुठे व कसा उपलब्ध होतो ?
मित्र हो, काही दिवसांपूर्वी आमच्या मातुश्रींच्या मुखातून सादर केलेली प्रवचने आपण ऐकली असतील. मी त्यातील क्र. 27 - 9 हे ऑडिओ प्रवचन ऐकताना  असे वाटले की त्यातील कथानकाचा भाग प्रत्यक्ष महाभारतात कुठे व कसा उपलब्ध आहे. त्यातील भाग सादर करताना त्यांनी किती संकलित करून सादर केला आहे वगैरे या उत्सुकतेने मी महाभारताचे मराठीतील अनुवाद शोधले. त्यापैकी एकातील काही भाग वाचकांना सदर करत आहे.
हाच भाग मी का निवडला?
श्रीकृष्णांच्या चरित्राचे वाचन करताना अनेक वेळा असा विचार मनांत येतो की 
श्रीकृष्णांना  आपल्यादैवी सामर्थ्याने कौरव-पांडवाच्या युद्धामुळे होणाऱ्या मानवहानीला  रोखता येणे शक्य असताना त्यांनी तसे का केले नाही? मग ते खरोखरच महामानव होते की फक्त त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा भाव, भक्ती असल्यांकरिता ते दैवी शक्तींनी युक्त होते असे मानावे का? 
या पार्श्वभूमीवर उत्तर अनेकदा अनेकांनी दिलेले स्पष्टीकरण माझ्या वाचनात आहे, परंतु या भागात श्रीकृष्ण  स्वतः अशा प्रश्नाला कसे सामोरे गेले होते. 
या शिवाय द्वारकेला परतल्यावर बहीण सुभद्रेला तिच्या मुलगा - सुनेचा पती अभिमन्यू गेल्याची वार्ता सांगायचा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या मुखाने रणांगणात एक एक वीरांनी कसा पराक्रम केला आणि वीरगतीला प्राप्त झाले ते वडील वसुदेव आणि इतरांना समोर बसवून कथन करतात.  
असा सहसा ऐकायला किंवा माहिती नसलेला कथाभाग असल्याने  माझी उत्सुकता वाढली. असो. 
 श्रीकृष्ण कौरव पांडवांत सलोखा व्हावा. युद्ध टळावे यासाठी वाटाघाटी करायला द्वारकेहून हस्तिनापुरला जाताना वाटेत (राजस्तान?) मरू प्रदेशातील उत्तंक नामक ऋषींच्या आश्रमात भेटी घेतली. 'तू प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेस. तेव्हा तुला हे काम मुळीच अवघड नाही. मला खात्री आहे की तू या वाटाघाटीत यशस्वी होशील' वगैरे ते श्रीकृष्णांनी उददेशून म्हणाले होते. आता श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रेबरोबर द्वारकेला परत जात असताना वाटेत त्याच उत्तंक ऋषींच्या आश्रमात भेटतात. त्यावेळच्या चर्चेत श्रीकृष्ण युद्ध थांबवायला अयशस्वी ठरल्याचे ऐकून भडकले. 'म्हणजे तू साक्षात परमात्मा आहेस यावरचा माझा विश्वास आता उडाला आहे' वगैरे बोलून निर्भत्सना केली, नव्हे त्यांना शाप द्यावा असा मनांत विचार आला!'....
यावर श्रीकृष्णांचे काय उत्तर होेते? ज्या उत्तंक ऋषींना ते सांगितले गेले,  ते त्यांना पटले का? त्यांच्या पुर्वचरित्रातील काही कर्मांचा त्यांच्या वागण्यावर प्रभाव होता? वगैरे मंगला हत्याकांड कथनातून संकलितपणे सांगितले गेले आहे. ते आपण ऐकावे अशी विनंती करतो. त्यातील कथेचे संपूर्ण वर्णन मराठीतील अनुवादात कसे आहे ते ही वाचायला मिळणे इच्छुकांना रंजक वाटेल म्हणून पुढील भागात सादर...



यापुढील कथनातील भाग 27 -9 सांगताना मंगला ओक यांनी 
द्वारकेतील आपल्या  परिवाराला महायुद्धाची वार्ता कशी सांगितली....अभिमन्युच्या मृत्युच्या वार्तेचा परिणाम सुभद्रेला एक माता म्हणून व उत्तरेला पत्नी म्हणून कसा वेगवेगळा झाला याचे वर्णन केले आहे. ते प्रत्यक्ष महाभारत ग्रंथात कसे येते याची एक झलक...
















 ....... समाप्त........